केरळच्या अग्नितांडवाने हादरलो- सचिन तेंडुलकर

केरळच्या अग्नितांडवाने हादरलो, असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिर आवारातील ही घटना आहे. रविवारी पहाटे येथे भीषण आग लागली. आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यु झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले आहेत.

Updated: Apr 10, 2016, 11:34 PM IST
 केरळच्या अग्नितांडवाने हादरलो- सचिन तेंडुलकर title=

कोल्लम : केरळच्या अग्नितांडवाने हादरलो, असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिर आवारातील ही घटना आहे. रविवारी पहाटे येथे भीषण आग लागली. आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यु झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले आहेत.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी केरळच्या कोल्लम मंदिरामध्ये झालेल्या अग्नितांडवाची बातमी ‘ऐकून मी प्रंचड हादरलो’ अशाप्रकारचं ट्वीट केलं आहे. केरळमध्ये कोल्लमच्या पुट्टिंगल मंदिरामध्ये रविवारी पहाटे ३.३० वाजता फटाक्यांच्या आतिशबाजीत  भीषण आग लागली. 

शेकडो भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर रितेश देशमुख, सदानंद गौडा यांनी सदर घटनेबाबत ट्विट करून हळहळ व्यक्त केली.