मुलायम सिंग यांना स्वाइन फ्लूची लागण?

सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. गुढगावच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Updated: Mar 7, 2015, 07:40 PM IST
मुलायम सिंग यांना स्वाइन फ्लूची लागण? title=

नवी दिल्ली : सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. गुढगावच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

तर दुसरीकडे स्वाइन फ्लूवरील उपचारानंतर अभिनेत्री सोनम कपूरला डिसचार्ज. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांना दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. युरिनरी इन्फेक्शन झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मात्र त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचीही भीती व्यक्त केली जातेय. 

स्वाइन फ्लूच्या चाचण्या करण्यात येत असून रिपोर्ट येई पर्यंत अजून काही निश्चित सांगता येत नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. मुलायम सिंग यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही उपस्थित आहेत. 

काल रात्री त्यांना लखनऊहून दिल्लीला हलवण्यात आलं. लखनऊत त्यांना संजय गांधी इन्सिटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथून त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.