बंगळुरूत राहुल गांधींचा विद्यार्थ्यांनी केला 'पोपट'

Updated: Nov 25, 2015, 05:54 PM IST
बंगळुरूत राहुल गांधींचा विद्यार्थ्यांनी केला 'पोपट' title=
 
 
बंगळुरू : माऊंट कार्मिल महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना राहुल गांधींना अपेक्षित असलेली उत्तर न मिळाल्यानं ते चांगलेच अडचणीत आले. राहुल गांधींच्या अनेक प्रश्नांची विद्यार्थ्यांनी 'नाही' अशी उत्तरं दिली.

मोदी सरकारच्या पॉलिसीज काम करत आहेत का? या प्रश्नावर अनेक विद्यार्थ्यांनी 'हो' अशी उत्तरं दिल्याने राहुल गांधी यांची चांगलीच ना-चक्की झाली.

मोदी सरकारवर टीका करत त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा काही परिणाम दिसत आहे का हा प्रश्न केल्यानंतरही अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच दिलं.

राहुल गांधीही आपल्या म्हणण्यावर ठाम होते आणि याचा कोणताही परिणाम दिसत नसल्याचं म्हणत होते, पण विद्यार्थीही काही कमी नव्हते ते ही परिणाम होत असल्याचं ओरडून सांगत होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.