जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?

नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.

Updated: Apr 13, 2017, 12:56 PM IST
जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी? title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट यावर महत्त्वपूर्ण निर्णय देऊ शकतो. त्यानंतर लोकांना जुन्या नोटा बदला येणार आहेत. सुप्रीम कोर्ट जुलैमध्ये ठरवेल की, ज्या लोकांनी कोणत्या कारणांमुळे जुन्या नोटा नाही बदलल्या. यासाठी सरकारला पुन्हा एकदा अशा लोकांना संधी देण्यासाठी सांगितलं जावं की नाही. याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे.

३० डिसेंबरच्या आधी नोटा जमा नाही केल्याने अधिक प्रकरणं समोर आली आहेत. याबाबत अनेक याचिका देखील कोर्टात दाखल झाल्या आहेत. एका याचिकेत तर याचिकाकर्त्याने ६६.८० लाख रुपये बँकेत केवायसी डॉक्यूमेंट जमा न केल्यामुळे पैसे जमा नाही करु शकला असं म्हटलं आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकरणांना लक्षात घेत कोर्ट यावर महत्त्वपूर्ण निर्णय देऊ शकतो.