नीब करोडी बाबाच्या मंदिरात आशीर्वादासाठी आले होते जुकरबर्ग आणि जॉब्स

फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ स्टीव्ह जॉब्स भारतातील ज्या मंदिरात गेला होता. त्याचा शोध लागला आहे. नैनीताल येथून जवळच पंतनगर येथे असलेल्या नीब करोडी मंदिरात हे दोघे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे. 

Updated: Oct 1, 2015, 02:21 PM IST
नीब करोडी बाबाच्या मंदिरात आशीर्वादासाठी आले होते जुकरबर्ग आणि जॉब्स  title=

नैनीताल : फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ स्टीव्ह जॉब्स भारतातील ज्या मंदिरात गेला होता. त्याचा शोध लागला आहे. नैनीताल येथून जवळच पंतनगर येथे असलेल्या नीब करोडी मंदिरात हे दोघे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे. 

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात या जागेचा खुलासा करण्यात आला आहे.  नैनीतालजवळ असलेल्या कैंची येथील मंदिर आणि आश्रमाशी संबंधीत सेक्रेटरी विनोद जोशी यांना अनेक वर्षांपूर्वी एक अमेरिकन फिजिशन लॅरी ब्रिलियंट आणि सामाजिक कार्य करणाऱ्या google.org मधून कॉल आला होता. जोशी यांनी सांगितले की लॅरी यांनी सांगिले की कोणी मार्क म्हणून आश्रमाला भेट देण्यासाठी येणार आहे. 

आपले सारे जीवन आध्यात्मिक गुरू नीब करोडी (नीम करोली) बाबाच्या सेवेत घालविणारे जोशी यांना स्पष्टपणे आठवत नाही की कॉल कधी आला होता. तेव्हा माहीत नव्हते की मार्क झुकरबर्ग कोण आहे. त्यावेळी फेसबूक दीड अब्ज लोकांच्या रोजची सवय बनलं नव्हतं. 

पण त्यांना आठवते की झुकरबर्ग पंतनगर येथे आले होते. त्यानंतर ते नीब करोडी बाबाच्या आश्रमात गेले होते. नीब करोडी बाबा यांचे निधन होऊन ३२ वर्ष झाले आहेत, पण आजही हा आश्रम हायप्रोफाईल अमेरिकन्सला आकर्षीत करीत आहे. 

फेसबूकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर नीब करोडी बाबांचा आश्रम अचानक चर्चेत आला. झुकरबर्ग यांनी या मुलाखतीत सांगितले की भारतात स्टीव्ह जॉब्स यांच्या सल्ल्यानंतर मी एका मंदिरात गेलो होतो. त्यामुळे माझे फेसबूक बुडता बुडता वाचले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.