कोण होणार उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री? ही दोन नावं आघाडीवर

उत्तर प्रदेशचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा अद्याप कायम आहे.

Updated: Mar 16, 2017, 10:56 PM IST
कोण होणार उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री? ही दोन नावं आघाडीवर  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा अद्याप कायम आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग या दोघांची नावं सध्या आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. 18 मार्चला संध्याकाळी 5 वाजता लखनऊमध्ये पक्षाच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित होईल, असं पक्षाकडून सांगण्यात आलंय. या बैठकीला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भूपेंद्र यादव हे पक्षनिरीक्षक म्हणून उपस्थित असतील. त्यामुळे देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार हे शनिवारीच स्पष्ट होऊ शकेल.