यंदा सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 12:07 PM IST
यंदा सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज title=

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलंय. 

याआधीच्या भविष्यवाणीत हवामान खात्यानं सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण गेल्या काही दिवसात मान्सूनसाठी घातक असणाऱ्या एल निनोचा प्रभाव कमी होत चालला आहे.

त्यामुळे यंदा मान्सून दीर्घकालीन सरासरी इतकाच बरसेल असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सरासरीपेक्षा अधिक मान्सून होण्याची शक्यता नसल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. 94 ते 104 टक्के पाऊस पडला तर सरासरी इतकाच मानला जातो. 

यंदा पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोचा मान्सूनवर होणारा परिणाम अत्यल्प असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.