शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन

By Jaywant Patil | Last Updated: Friday, February 8, 2013 - 19:10

www.24taas.com, बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.
या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांनी संपूर्ण सीमाभागातील कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांवर मराठीची सक्ती करावी अशी मागणी केली. तसंच सीमा संग्राम समितीची स्थापना करण्याची घोषणा केली.
8 फेब्रुवारी १९६९ साली मुंबईमध्ये शिवसेनेच्या वतीने सीमा प्रश्नावर उग्र आंदोलन छेडण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या गोळीबारात ६९ शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात येतो. विशेष म्हणजे या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना ३ महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला होता.

First Published: Friday, February 8, 2013 - 19:10
comments powered by Disqus