महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद

महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले आहेत. काश्मीरच्या नगरोटामध्ये नांदडेचे जवान संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे दोघे शहीद झाले आहेत. मेजर गोसावी हे 9 वर्षापासून सैन्यात आहेत. 

Updated: Nov 29, 2016, 06:11 PM IST
महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद title=

जम्मू-काश्मीर : महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले आहेत. काश्मीरच्या नगरोटामध्ये नांदडेचे जवान संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे दोघे शहीद झाले आहेत. मेजर गोसावी हे 9 वर्षापासून सैन्यात आहेत. 

26 नोव्हेंबर रोजी ते पंढरपूरातून कुटूंबियासोबत सुट्टी घालवत असताना  तातडीने सैन्यातून बोलावणे आल्याने सेवेत हजर होण्यासाठी गेले होते. मेजर कुणालगीर यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, पत्नी उमा, चार वर्षांची मुलगी उमंग आहेत. मेजर गोसावी हे नऊ वर्षांपासून सैन्यात होते. 

तर संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी या गावचे रहिवाशी आहेत. संभाजी कदम शहीद झाल्याचे कळाल्यानंतर जाणापुरी या त्यांच्या मूळ गावी एकच शोककळा पसरली...