उत्तराखंड अपघातात महाराष्ट्रातील 4 जण ठार, 6 जखमी

उत्तराखंड येथे टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील अमरावती येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2017, 08:57 PM IST
उत्तराखंड अपघातात महाराष्ट्रातील 4 जण ठार, 6 जखमी title=

टिहरी, उत्तराखंड : जिल्ह्यात टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील अमरावती येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत. हे सगळे आज सकाळी गंगोत्री येथून केदारनाथच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.

चंगोरातील लांबगाव-कोटलगाव-चमियाला मार्गावर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाल्याचे टिहरीचे विशेष पोलीस अधीक्षक एन. एस. नापलच्याल यांनी सांगितले.

सर्व मृतदेह हाती लागले असून चालकासह सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे तर अन्य पाच जणांना गंभीर दुखापत झालेली नाही, असे सांगण्यात आले.

मृतांची नावे :

1) चंद्रकांत सीताराम कारकर ,वय 61 विद्युतनगर अमरावती
2) कुंदादेवी चंद्रकांत कारकर, वय 50, विद्युतनगर अमरावती
3)  मीनाताई सुधाकर मुरारी,वय 48, विद्युतनगर अमरावती
4) संजय पाटील, वय 57, वसुंधरा कॉलनी अमरावती

जखमींची नावे

1) सतीश राऊत, वय -53 धामणगाव
2) अर्चनादेवी राऊत
3) मुलगी आर्या सतीश राऊत
4)श्रीमती पौर्णिमा वैभव ,वय 50
5) सुधाकर राऊत, वय 55
 जखमी एकाचे नाव समजू शकलेले नाही.