VIDEO : विद्यार्थ्यांसमोर आयटम साँगवर शिक्षकांनी धरला ठेका, अन्...

त्रिपुराची राजधानी आगरतळा इथल्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसमोर बॉलिवूडच्या गाण्यांवर धरलेला ठेका चांगलाच महागात पडलाय. 

Updated: Sep 12, 2015, 06:41 PM IST
VIDEO : विद्यार्थ्यांसमोर आयटम साँगवर शिक्षकांनी धरला ठेका, अन्...  title=

आगरतळा : त्रिपुराची राजधानी आगरतळा इथल्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसमोर बॉलिवूडच्या गाण्यांवर धरलेला ठेका चांगलाच महागात पडलाय. 

खुदीराम बोस या इंग्रजी शाळेच्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू होतं... यासाठी रंगीत तालिमही सुरू होती. यावेळी एका शिक्षिकेनं बॉलिवूडच्या आयटम साँगवर चांगलाच ठेका धरला... आपल्यासोबत ठुमके लगावण्यासाठी तिनं आपल्या सहकाऱ्यांनाही प्रोत्साहित केलं.

दरम्यान, हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. यूट्यूबवर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच तो वायरल झाला. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित शिक्षकांकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं. पण, संतोषजनक उत्तर न मिळाल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.