महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत

काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

Updated: Mar 8, 2016, 04:18 PM IST
महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

हर्ले डेव्हिडसन ही अमेरिकन बनावटीची महागडी बाईक आहे. या बाईकचे वजन ३०० किलो असून, १६०० सीसीचे इंजिन आहे. तिची किंमत ११ लाख एवढी आहे.

रंजन या बिहारमधील सुपौलच्या खासदार आहेत. त्यांचा पप्पू यादव यांच्याशी विवाह झाला आहे. अनेक दिवसांपासून ही बाईक चालवत आहे. या बाईकवरून आज एक फेरी मारली. यावेळी एक महिला दुचाकी चालवू शकत नाही का? असा सवालही त्यांनी केला. 

संसदेतील महिला खासदार

सध्या, लोकसभेत ५४३ सदस्यांपैंकी केवळ ६५ महिला खासदार आहेत... म्हणजेच १२ टक्क्यांहून कमी... तर राज्यसभेत २४१ सदस्यांपैंकी फक्त ३१ महिला आहेत. १६ व्या लोकसभेमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वांत जास्त महिलांची संख्या आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, महिला खासदारांच्या बाबतीत भारत जगातील १०३ व्या क्रमांकावर आहे.