पाहा, जगभरातील 'मायकल जॅक्सन स्टाईल'ने ट्रॅफिक कंट्रोल करणारे हवालदार

खालील व्हिडीओ पाहून, सुरूवातीला तुम्हाला प्रश्न पडेल हा वाहतूक विभागाचा हवालदार आहे की मायकल जॅक्सन, पण हा हवालदार आपलं काम इमानदारीने करतोय, हे महत्वाचंय. कुंवरजित सिंह असं या ट्रॅफिक हवालदाराचं नाव आहे.

Updated: Jul 20, 2015, 01:23 PM IST
पाहा, जगभरातील 'मायकल जॅक्सन स्टाईल'ने ट्रॅफिक कंट्रोल करणारे हवालदार title=

इंदूर : खालील व्हिडीओ पाहून, सुरूवातीला तुम्हाला प्रश्न पडेल हा वाहतूक विभागाचा हवालदार आहे की मायकल जॅक्सन, पण हा हवालदार आपलं काम इमानदारीने करतोय, हे महत्वाचंय. कुंवरजित सिंह असं या ट्रॅफिक हवालदाराचं नाव आहे.

बंद पडलेलं वाहन असो की, वाहतुकीची गुंतागुंत सोडवण्यासाठी हा हवालदार नेहमीच पुढे असतो, आपल्या अनोख्या स्टाईलने नेहमीचं वाटणार काम या हवालदाराला आणखी आनंद देतं, वाहनधारकांनाही याचा आनंद असतो, आणि रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागते. 

या व्हिडीओच्या निमित्ताने आम्ही खाली ४ व्हिडीओ शेअर करत आहोत, जगभरात अशा स्टाईलने कोण-कोणते ट्रॅफिक पोलिस, कोणकोणत्या देशात काम करतात ते पाहा.

पाहा, इंदूरच्या ट्रॅफिक हवालदाराची मायकल जॅक्सन स्टाईल

पाहा, फिलिपाईन्सच्या ट्रॅफिक हवालदाराची मायकल जॅक्सन स्टाईल

पाहा, मॅक्सिकन ट्रॅफिक हवालदाराची मायकल जॅक्सन स्टाईल

हॉलीवूडच्या या सिनेमाकडून यांनी प्रेरणा घेतली की, सिनेमाच्या दिग्दर्शकाने यांच्याकडून?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.