धक्कादायक: पती आणि पत्नी भाऊ-बहिण असल्याचं उघड

आपल्या आईचा शोध घेणाऱ्या एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर कळलं की तिचा नवरा तिचा भाऊ आहे. ही धक्कादायक घटना ब्राझीलची आहे. 39 वर्षीय अँड्रियना आणि तिचा 37 वर्षीय नवरा लिनार्डो यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना सहा वर्षाची एक मुलगी आहे. 

Updated: Aug 7, 2014, 07:38 PM IST
धक्कादायक: पती आणि पत्नी भाऊ-बहिण असल्याचं उघड title=

ब्राझील: आपल्या आईचा शोध घेणाऱ्या एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर कळलं की तिचा नवरा तिचा भाऊ आहे. ही धक्कादायक घटना ब्राझीलची आहे. 39 वर्षीय अँड्रियना आणि तिचा 37 वर्षीय नवरा लिनार्डो यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना सहा वर्षाची एक मुलगी आहे. 

अँड्रियना एक सौंदर्य प्रसाधन सेल्सवुमन आहे. ती 1 वर्षाची असतांना तिची आई तिला सोडून गेली. त्यामुळं तिनं कधीच आईला पाहिलं नव्हतं. तर ट्रक ड्रायव्हर असलेला लिनार्डो त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता. लिनार्डो त्याच शहरात राहिला. तर अँड्रियनानं घरकाम करण्यासाठी तिचं होमटाऊन सोडलं ... 15 वर्षाची असतांना 3 मुलांचा बाप असलेल्या पुरुषाची तिचं लग्न झालं.  

मात्र काही वर्षानंतर तिनं ते लग्न मोडून पुन्हा आपल्या साओ पाओलो गावी राहायला आली. आणि 10 वर्षांपूर्वी इथंच अँड्रियना आणि लिनार्डोची पहिली भेट झाली.

दोघांच्या आयुष्याची कथा सारखी होती पण त्यांना तो योगायोग वाटत होता. मात्र अँड्रियनानं आईचा शोध घेतला तेव्हा त्यांना आई तर मिळाली पण त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. कारण जे जोडपं म्हणजे प्रत्यक्षात सख्खे भाऊ-बहिण असल्याचं स्पष्ट झालं. 

ही माहिती मिळताच अँड्रियना खूप घाबरली होती. कारण तिचं लिनार्डोवर खूप प्रेम असून तो सोडून तर जाणार नाही ना, याची भीती तिला वाटली. पण हे सगळं कळल्यानंतरही दोघं एकत्र आहेत. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.