भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका

भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.

PTI | Updated: Aug 15, 2015, 07:12 AM IST
भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका title=

वॉशिंग्टन : भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गौरवशाली वारशाचे स्मरण करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी जगामध्ये भारताचे स्थान एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावतीने संदेश दिला.

भारताची वाटचाल ही आर्थिक सत्तेच्या दिशेने आहे. दहशतवादाच्या संकटाचा सामना करणारी लोकशाही तसेच आंतरराष्ट्रीय संकेतांचा आदर करणारा देश आहे. जगातील दोन सर्वांत मोठे लोकशाही देश म्हणून भारत व अमेरिका हे स्वातंत्र्य व इतर मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र उभे आहेत, असे केरी यांनी म्हटलेय.

भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिकेला अभिमान आहे. अध्यक्ष ओबामा यांनी गेल्या प्रजासत्ताकदिनी भारतास दिलेल्या भेटीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. विविध समुदाय आणि संस्कृतींचा अंतर्भाव असलेली भारताची भूमी अत्यंत सुंदर आहे. भारताच्या या अत्यंत समृद्ध राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटणारे कुतूहल ओसरत नाही, असे कौतुक केरी यांनी केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.