पाकिस्तानमध्ये पुन्हा अतिरेकी हल्ला

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरली. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आज पुन्हा हल्ला चढविण्यात आला आहे. कराचीजवळ हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 01:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कराची
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरली. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आज पुन्हा हल्ला चढविण्यात आला आहे. कराचीजवळ हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यामुळे अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात आलाय.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ल्यात 23 जण ठार झाले होते. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर हल्ला केला. यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेला.
विमानतळावरील जुन्या टर्मिनलवर या अतिरेक्यांनी हल्ला केला. अचानक विमानतळात घुसून त्यांनी हॅन्डग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली आणि अंदाधूंद गोळीबार केला. विमानतळावरील इंधन साठ्यालाही तसंच दोन विमानांनाही आग लावली. तब्बल पाच तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये 10 अतिरेक्यांना ठार मारण्यास यश आलं. हजला जाणारे यात्रेकरू आणि VVIP हे अतिरेक्यांच्या निशाण्यावर होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.