भारतासोबत बिघडत्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार

डोनाल्ड ट्रंप सराकारने भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडत असलेल्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान दोषी ठरवत अमेरिकेने म्हटलं की जर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर मोठा हल्ला झाला तर यामुळे अजून संबंध बिघडू शकतात.

Updated: May 12, 2017, 09:25 AM IST
भारतासोबत बिघडत्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार   title=

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रंप सराकारने भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडत असलेल्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान दोषी ठरवत अमेरिकेने म्हटलं की जर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर मोठा हल्ला झाला तर यामुळे अजून संबंध बिघडू शकतात.

नॅशनल इंटेलिजेंसचे डॅनियल कोट्सने यांनी म्हटलं की, भारताविरोधात दहशतवाद्यांना मिळणारा सहयोगाला बंद करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. सीमेपलीकडून भारतात होणारे हल्ले, पठानकोट हल्ला याबाबत पाकिस्तानने चौकशीत कोणतीच प्रगती केलेली दिसत नाही. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अजून बिघडण्याची शक्यता आहे.

कोट्स यांनी म्हटलं की, २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून भारतात येऊन दोन मोठे हल्ले केले त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अजून बिघडले आहेत.