दोन शुक्रवार आणि चित्रपट ११

फेब्रुवारी महिन्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतायत मात्र ते बॉक्स ऑफिसवर किती चालतील याबाबत शंकाच आहे. 

Updated: Feb 18, 2016, 04:00 PM IST
दोन शुक्रवार आणि चित्रपट ११ title=

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतायत मात्र ते बॉक्स ऑफिसवर किती चालतील याबाबत शंकाच आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हेच पाहायला मिळाले. पुढील दोन शुक्रवारी हॉलीवूड आणि बॉलीवूड मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल १५हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतायत. 

गेल्या दोन शुक्रवारी पाच चित्रपट रिलीज झाले होते. या महिन्यातील उरलेल्या दोन शुक्रवारी एकूण ११ चित्रपट रिलीज होतायत. १९ फेब्रुवारीला पाच चित्रपट प्रदर्शित होतायत. तर २६ फेब्रुवारी सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. 

बहुप्रतिक्षित सोनम कपूरचा नीरजा हा सिनेमा उद्या म्हणजेच शुक्रवारी रिलीज होतोय. इतके चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होत असल्याने साहजिकच त्याचा परिणाम या चित्रपटांच्या कमाईवर होईल. नीरजासोबत इश्क फॉरेव्ह, लव्हशुदा, डायरेक्ट इश्क हे चित्रपट येतायत.