फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्यांवर अभय देओलची टीका

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणा-या सेलिब्रिटींवर अभिनेता अभय देओलनं जोरदार टीका केलीय.

Updated: Apr 13, 2017, 05:48 PM IST
फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्यांवर अभय देओलची टीका title=

मुंबई : फेअरनेस क्रीमची जाहिरात करणा-या सेलिब्रिटींवर अभिनेता अभय देओलनं जोरदार टीका केलीय. यासंदर्भातल्या पोस्ट अभयनं त्याच्या फेसबुक अकाऊण्टवर टाकल्या आहेत.  

गोरी व्यक्ती ही सावळ्या व्यक्तीपेक्षा चांगली असते किंवा वरचढ असते, असं दाखवण्याचा बालीश प्रयत्न ही फेअरनेस क्रीम करतात. दुर्दैवानं आपल्याकडे लग्नावेळीही गोरी मुलगी हवी, असा आग्रह असतो. जे सेलिब्रिटी अशा क्रीमची जाहिरात करतात, त्यांच्यावर अभयनं सडेतोड टीका केलीय. शाहरूख खान, जॉन अब्राहम, विद्या बालन, शाहिद कपूर, दीपिका पदूकोण, सोनम कपूर या बॉलीवूड सेलिब्रिटींना फेसबूक पोस्टमधून लक्ष्य केलं आहे.