माधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...

दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत. 

Updated: Jun 1, 2015, 04:33 PM IST
माधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत... title=

मुंबई : दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत. 

बारबंकीच्या स्थानिक कोर्टात बीग बी आणि प्रिती झिंटा यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आलीय. अतिरिक्त लीड आणि मोनोसोडियम ग्लूटामेट प्रमाणापेक्षा अधिक आढळल्यामुळे मॅगीचे हजारो पॅकेटस् जप्त करण्यात आलेत. 

नेस्ले कंपनीच्या 'मॅगी'ची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडचे तीन स्टार्स म्हणजेच माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटा यांच्यासोबतच 'नेस्ले इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवरही शनिवारही खटला दाखल करण्यात आला. 

या प्रकरणानंतर माधुरीनं जेव्हा 'नेस्ले' कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा मात्र तिला 'मॅगी'च्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं. 

यूपी फूड रेग्युलेटर 'एफएसडीए'द्वारे (फूड सेफ्टी अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन)  अॅड. संतोष कुमार सिंह या प्रकरणावर युक्तीवाद करणार आहेत. तर चीफ ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट सत्यदेव गुप्ता यांच्या न्यायालयासमोर १ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.