असा झाला राजीव भाटीयाचा अक्षय कुमार

बॉलिवूडमध्ये येताना आपलं नाव बदलणाऱ्या मंडळीपैकी एक म्हणजे अक्षय कुमार. अमृतसरस्थित राजीव भाटीयाचा अक्षय कुमार होण्याचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Intern - | Updated: Mar 29, 2017, 05:49 PM IST
असा झाला राजीव भाटीयाचा अक्षय कुमार title=
मुंबई : बॉलिवूडमध्ये येताना आपलं नाव बदलणाऱ्या मंडळीपैकी एक म्हणजे अक्षय कुमार. मुळचा अमृतसरचा असलेल्या राजीव भाटीयाचा अक्षय कुमार होण्याचा प्रवास रंजक आहे.
अक्षय कुमार सध्या त्याचा नवीन चित्रपट 'नाम शबाना'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनवेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यानं हा प्रवास उलगडून दाखवला.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्याच्या नावाविषयी विचारलं असता तो म्हणाला की, ' माझ्या पहिल्या चित्रपटाचं, आज या १९८७ साली आलेल्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं होतं. या चित्रपटात कुमार गौरव यांची प्रमुख भूमिका होती आणि माझी भूमिका ४.५ सेकंदांची होती. मग मी उरल्या वेळेत गौरव यांना बघत बसायचो. त्यांच्या कॅरेक्टरचा अभ्यास करायचो. नंतर एकदा मी बांद्रे कोर्टात जाऊन माझं नाव बदलून घेतलं. मला त्याचं स्पष्ट कारण आठवत नाही पण मी स्वत: नाव बदलून घेतलं.'

'त्यावेळी मला काहीच काम नसतानाही मी माझी व्हिझिटींग कार्ड बनवून घेतली होती. नंतर मी कामं शोधायला सुरवात केल्यावर मला कामं मिळत गेली' , असाही किस्सा या खिलाडीने सांगितला