अर्जुन रामपाल पोहचला भाजप मुख्यालयात, म्हटला मी मोदी समर्थक

 अभिनेता अर्जुन रामपालने आज भाजप मुख्यालयाला भेट दिली. यावेळी तो कैलास विजयवर्गीय आणि संघटन सरचिटणीस रामलाल यांच्याशी भेट घेतली. यावेळी तो म्हटला की मी मोदी समर्थक आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2017, 03:26 PM IST
अर्जुन रामपाल पोहचला भाजप मुख्यालयात, म्हटला मी मोदी समर्थक  title=

नवी दिल्ली :  अभिनेता अर्जुन रामपालने आज भाजप मुख्यालयाला भेट दिली. यावेळी तो कैलास विजयवर्गीय आणि संघटन सरचिटणीस रामलाल यांच्याशी भेट घेतली. यावेळी तो म्हटला की मी मोदी समर्थक आहे. 

मोदी सरकार जे पण काम करीत आहे. ते जनतेच्या हितासाठी करीत आहे. जे पण करण्याची गरज आहे ते मोदींसाठी करणार असल्याचेही त्यांनी यावेळेस नमूद केले. 

पक्षात सामील होण्याबद्दल तो म्हणाला की मी अद्याप याबाबत काहीही औपचारीकपणे सांगू शकत नाही. पण आशा आहे की ज्या पद्धतीने अर्जुन रामपाल याने कैलास विजयवर्गीय आणि रामपाल यांची भेट घेतली, त्यावरून असे वाटते की तो लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. 

निवडणुकीत प्रचाराबाबत अर्जुन म्हटला की उमेदवार चांगला असेल तर त्यांच्यासाठी प्रचार करू शकतो.  मी राजकारणी नाही पण उमेदवार पाहून प्रचार करू शकतो असेही अर्जुन म्हटले आहे.