'तारक मेहता'च्या 'बबिता जी'चे या अॅक्टरशी होते संबंध

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता भलेही सध्या सिंगल असली तरी एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.

Updated: Apr 19, 2016, 04:01 PM IST
'तारक मेहता'च्या 'बबिता जी'चे या अॅक्टरशी होते संबंध title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता भलेही सध्या सिंगल असली तरी एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.

नक्की काय झाले होते

वॅलेंटाईन्स डेच्या दिवशी अरमानने काहीतरी कारणावरुन मुनमुन दत्ताला मारहाण केली होती. यानंतर मुनमुनने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. आपल्या वर्तणुकीमुळे अरमानला त्यावेळी दंडही भरावा लागला होता. 

अरमानशी ब्रेकअप झाल्यानंतर बबिता आतापर्यंत सिंगल आहे. लग्न करण्यात सध्या तरी तिला रस नाही. तिला संपूर्ण जग फिरायचे आहे. तसेच चित्रपटात काम करण्याचीही तिची इच्छा आहे. 

जेठालालने दिला होता रोल

मजेशीर गोष्ट अशी की तारक मेहतामध्ये मुनमुनला बबिताची भूमिका शोमधील प्रमुख जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी मिळवून दिली होती. या दोघांनी आधी 'हम सब बाराती'मध्ये काम केले होते. त्यामुळे तारक मेहतासाठी कास्टिंग सुरु होती तेव्हा मुनमुनचे नाव दिलीप जोशींनी सुचवले होते.