दिलवाले-बाजीरावमध्ये 'कांटे की टक्कर'

दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता  दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.

Updated: Jan 2, 2016, 04:30 PM IST
दिलवाले-बाजीरावमध्ये 'कांटे की टक्कर' title=

मुंबई : दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता  दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.

एकाच दिवशी रिलीज झालेले दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांनी चांगलीच कमाई केली आहे. ११ दिवसांमध्ये बाजीराव मस्तानीने आतापर्यंत भारतात १३६.५० कोटींची कमाई केली आहे. तर दिलवालेने १३२.७५ कोंटींची कमाई केली आहे.