सलमानने माझ्या ओठांना प्रसिद्धी मिळवून दिलीय

मस्तीजादे' आणि 'क्या कूल हैं हम 3' या आगामी चित्रपटांमुळे सध्या गिझेल ठकराल चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसमध्येही तिने आपला जलवा दाखवलाय. मात्र कमी फॅन्स असल्याने ती बिग बॉसमधून बाहेर आहे. मात्र बिग बॉसने तिला बरंच काही दिलंय असं तिचं म्हणण आहे. 

Updated: Jan 2, 2016, 03:08 PM IST
 सलमानने माझ्या ओठांना प्रसिद्धी मिळवून दिलीय title=

मुंबई : मस्तीजादे' आणि 'क्या कूल हैं हम 3' या आगामी चित्रपटांमुळे सध्या गिझेल ठकराल चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसमध्येही तिने आपला जलवा दाखवलाय. मात्र कमी फॅन्स असल्याने ती बिग बॉसमधून बाहेर आहे. मात्र बिग बॉसने तिला बरंच काही दिलंय असं तिचं म्हणण आहे. 

या शोचे निवेदन कऱणाऱ्या सलमान खानबद्दल तर ती भरभरुन बोलते. याचे कारण तिचे ओठ आहेत. जिजेलचे म्हणणे आहे, मोठ्या ओठांमुळे शाळेत तिला सतत ऐकावे लागायचे. बिग बॉसमध्येही असेच घडले. 

जेव्हा बिगबॉसमध्ये शाहरुख आला होता तेव्हा सलमानने माझ्या ओठांबद्दल काही म्हटले होते आणि आश्चर्य त्या दिवसापासून माझे ओठ प्रसिद्ध झाले, असे जिजेल म्हणाली. यासाठी ती सलमानचे आभारही मानते. पुढील काही दिवसांत जिजेलचे दोन्ही सिनेमे रिलीज होतायत. मात्र ती त्याबाबत उत्साही आहे. दोन्ही चित्रपटांकडून तिला अपेक्षा आहेत.