बॅंग-बॅंग सिनेमाचे पहिल्याच दिवशी चार रेकॉर्ड, ऋतिक-कतरिनाची जादू

अभिनेता ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा बॅंग-बॅंगने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलाय. हे करताना चार रेकॉर्ड पहिल्याच दिवशी केले.

Updated: Oct 3, 2014, 06:40 PM IST
बॅंग-बॅंग सिनेमाचे पहिल्याच दिवशी चार रेकॉर्ड, ऋतिक-कतरिनाची जादू title=

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा बॅंग-बॅंगने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलाय. हे करताना चार रेकॉर्ड पहिल्याच दिवशी केले.

दोन ऑक्टोबर गांधी जयंती सुट्टी निमित्ताने हा सिनेमा रिलीज करण्यात आला. एका दिवसात २७.५४ कोटी रुपयांची कमाई केली.

१. पहिल्याच दिवशी हा सिनेमा टॉप-५ फिल्ममध्ये दाखल झाला. जास्त कमाई करणाऱ्यांपैकी धूम-३ - ३६ कोटी, चेन्नई एक्सप्रेस - ३३.१० कोटी, एक था टायगर - ३२.९२ कोटी, सिंघम रिटर्न्स - ३२ कोटी यानंतर २७.१४ कोटी रुपयांची कमाई केली ती बॅंग-बॅंगने.

२.  पहिल्या दिवसात २७.१४ कोटी रुपयांची कमाई करत ऋतिक रोशनच्या करिअरमधील ही आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई आहे. क्रिश-३ने पहिल्या दिवशी २४.२५ कोटी रुपये कमाई केली.

३. कतरिना हिच्या करिअरमधील पहिल्याच दिवसात जास्त कमाई करणारा हा सिनेमा आहे. कतरिनाच्या दोन फिल्म धूम-३ आणि एक था टायगर यांनीही पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावले होते.

४. सिंघम रिटर्न्स या सिनेमाची ३२ कोटी रुपयांच्या कमाईनंतर बॅंग-बॅंग २०१४ मधील दुसरी सर्वात ओपनर फिल्म झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.