कॉमेडी नाईटच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुत्थीला रडू कोसळले

प्रसिद्ध कॉमेडी शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या शेवटच्या एपिसोडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. यात सर्वच कलाकार अतिशय भावूक झालेत. गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोव्हरला यावेळी आपले अश्रूही अनावर झाले. 

Updated: Jan 17, 2016, 10:32 AM IST
कॉमेडी नाईटच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुत्थीला रडू कोसळले title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडी शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या शेवटच्या एपिसोडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. यात सर्वच कलाकार अतिशय भावूक झालेत. गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोव्हरला यावेळी आपले अश्रूही अनावर झाले. 

यावेळी सुनील ग्रोव्हरने चाहत्यांनी दिलेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल आभार मानलेत. मी हे सगळ मिस करणार आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ होतो आणि मला माहीत नाही की असा काळ पुन्हा येईल, असे सुनील यावेळी म्हणाला. 

कॉमेडी नाईट्सच्या अखेरच्या भागात अक्षय कुमार एअरलिफ्टच्या प्रमोशनदरम्यान आला होता. यावेळी त्याने कपिलला विचारले की तु आता सिद्धू जी यांना मिस करणार ना? यावर कपिल म्हणाला, आम्ही दोघेही एकाच शहरातील आहेत. जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी त्यांच्याकडे जाईन.