दीपिका, कंगना आणि परिणीतीला कशी मुलं आवडतात?

आमीर खान सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण, परिणीती चोप्रा आणि कंगना राणावतने आपल्या मनातलं गुपित सांगितलं आहे. तीनही अभिनेत्रींनी आमीरला सांगितलंय की, त्यांना कोणत्या प्रकारचा मुलगा आवडतो. 

Updated: Nov 6, 2014, 04:30 PM IST
दीपिका, कंगना आणि परिणीतीला कशी मुलं आवडतात? title=

मुंबई : आमीर खान सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण, परिणीती चोप्रा आणि कंगना राणावतने आपल्या मनातलं गुपित सांगितलं आहे. तीनही अभिनेत्रींनी आमीरला सांगितलंय की, त्यांना कोणत्या प्रकारचा मुलगा आवडतो. 

आमीर खानने हसत हसत या अभिनेत्रींशी गंभीर विषयावर चर्चा केली आहे. आमीर खानचा शो सत्यमेव जयते 3 मध्ये  दीपिका, परिणीती, कंगना हे त्यांच्या दृष्टीकोनातून सांगणार आहेत की आदर्श पुरूष कसा असावा. 

कंगना राणावतने आपली पसंत सांगितली तिला, "संवेदनशील पुरूष आवडतो". दीपिकाने यावर बोलतांना सांगितलं, "एक पती म्हणून मला असा मुलगा आवडेल जो माझ्याशी बिनशर्त प्रेम करेल".

आमीर खानने आपल्या शो मध्ये आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीला बोलावलेलं नव्हतं, पण सत्यमेव जयते 3 मधील मागील एपिसोडमध्ये त्याने सलमान खानला बोलवलं यानंतर आता तीन अभिनेत्रींना एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आमीरने बोलावलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.