'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही'

नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.

Updated: Mar 30, 2016, 06:20 PM IST
'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही' title=

मुंबई : जॉन अब्राहम यांनी जवळ-जवळ १३ ते १४ वर्ष इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सिनेमे केले आणि फिटनेस आयकॉन म्हणूनही लौकिक मिळवला आहे, नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.

तू फक्त चित्रपटाच्या प्रमोशन वेळी दिसतो, अवॉर्डस घ्यायलाही दिसत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना, जॉन अब्राहम म्हणाला, मला कोणत्याही अवॉर्डसच्या कार्यक्रमात अजिबात रस नाही, मी इतरांच्या लग्नात पैसे घेऊन नाचणे पसंद करत नाही. मी आपल्या जीवनात काही तत्व आखली आहेत, ज्याचं मी खूप पालन करते, लग्न आणि पार्टीत न नाचणे यामागील एक आहे.

मात्र इतर अॅक्टर असं करतात, असं विचारल्यावर जॉन म्हणतो, अभिनेते याला कलाकाराच्या नावाखाली योग्य म्हणतात, पण असं केल्याने मला रात्री झोप येणार नाही, आणि माझी झोप उडू नये, म्हणून मी असं करणार नाही.