मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी सिनेमा 'मोहन्जोदडो' या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. पण, याचबरोबर तो आणखीही एका कारणामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतोय.
मोहन्जोदडो सिनेमाची अभिनेत्री पूजा हेगडे या आपल्या को-स्टारसोबत हृतिक सध्या जास्त वेळ व्यतित करत असल्याच्या चर्चांना बी-टाऊनमध्ये उधाण आलंय.
'बिग बँग' सिनेमातून एकच धूम उडवून देणाऱ्या हृतिकला पूजासोबत अनेक कार्यक्रमांत एकत्र पाहिलं गेलंय. त्यांची आपल्या टीमसोबत सेल्फीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
हृतिकनं मात्र याबाबत मौन राखलं असलं तरी सेटवर मात्र पूजा-हृतिकला एकत्र हसता-खिदळताना अनेकांनी पाहिलंय.
२०१४ मध्ये सुझान खान हिच्याशी घटस्फोटानंतर हृतिक अजून कोणत्या नात्यात आहे किंवा नाही, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु, घटस्फोटानंतरही हृतिक-सुझान अजुनही एकमेकांशी क्लोज असल्याचं नुकतंच हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी म्हटलं होतं.
हृतिक-पूजाचा 'मोहन्जोदडो' येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.