रिलीज होण्याआधी बाहुबली असेल आपल्या मोबाईलवर

बाहुबली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत नवा इतिहास रचला होता. आता या सिनेमाचा दुसरा भागही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

Updated: Feb 10, 2017, 10:30 AM IST
रिलीज होण्याआधी बाहुबली असेल आपल्या मोबाईलवर title=

मुंबई : बाहुबली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत नवा इतिहास रचला होता. आता या सिनेमाचा दुसरा भागही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

दुसरा भाग रिलीज होण्याआधी बाहुबली सिनेमावर आधारित नवा गेम येतोय. हा गेम मार्क स्केग्स बनवत आहेत. मार्क यांनी FarmVille आणि Lord of the Rings असे गेम बनवलेत. मार्क सध्या दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्याशी याबाबत चर्चा करतायत.

मार्क स्केग्ससोबत राजामौली याचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय. यात असं लिहिलयं की फार्म व्हिले आणि लॉर्ड ऑफ रिंग या गेमचे निर्माता बाहुबली मोबाईल गेमबाबत राजामौली यांच्याशी चर्चा करतायत.