माझ्या कामाचा मुलावर काहीही परिणाम होत नाही - मलायका

'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानंही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. 'मी केलेल्या आयटम साँगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं मलायकानं स्पष्ट केलंय. 

IANS | Updated: Apr 20, 2015, 04:55 PM IST
माझ्या कामाचा मुलावर काहीही परिणाम होत नाही - मलायका title=

मुंबई: 'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानंही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. 'मी केलेल्या आयटम साँगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं मलायकानं स्पष्ट केलंय. 

दिल से या चित्रपटातील छैय्या छैय्या, दबंगमधील मुन्नी बदनाम या गाण्यांमधील दिलखेचक नृत्यानं प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या मलायका अरोरा खानचा मुलगा अरहान आता १३ वर्षांचा झाला आहे. अरहानला त्याच्या आईच्या इमेजविषयी काय वाटते याची उत्सुकता सर्वांनाच असते. याविषयी मलायकाला प्रश्न विचारला असता मलायका म्हणते, मला डान्स करायला आवडते आणि ते मी मनापासून इन्जॉय करते. माझ्या कामाचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही. त्याला या गोष्टींची सवय झाली आहे. 

माझा मुलगा अरहान अजून लहान आहे. पण त्याला माझं गाणं आवडलं तर तो स्वतःच मला येऊन सांगतो, असं मलायकानं म्हटलं आहे. गाणी हे चित्रपटातील महत्त्वाचे घटक असून गाण्यांमध्ये काम करणं हा नेहमीच मजेशीर अनुभव असतो. फक्त ते गाणं कसं चित्रीत केलं जातं आणि ते कसे दाखवलं जाईल हे महत्त्वाचं असतं, असं मलायका म्हणाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.