बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण

 बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2017, 08:44 PM IST
 बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण  title=

नवी दिल्ली :  बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. 

तामिळनाडूच्या कोर्टाने मंगळवारी आठ तमिळ चित्रपट कलाकारांविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. या कलाकारांमध्ये बाहुबली फेम कटप्पा अभिनेता सत्यरजा, सूर्या, आर शरत कुमार, श्रीप्रिया, विवेक, विजय कुमार, अरूण विजय आणि चित्रपट दिग्दर्शक चेरन सामील आहे. 

या कलाकारांवर मानहानीचा दावा एका पत्रकाराने दाखल केला आहे. २००९ मध्ये तामिळनाडूच्या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या लेखावर दक्षिण भारतीय चित्रपट कलाकारांच्या संघटनेने टीका केली होती. 

देहव्यापाराच्या एका प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्री भुवनेश्वरी हिला अटक केली होती. यानंतर एका वृत्तपत्रात या व्यापाराशी संबंधीत काही अभिनेत्रींची लिस्ट दिली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 

चित्रपट कलाकारांचे म्हणणे होते की या लेखामुळे चित्रपट अभिनेत्रीची प्रतिमा मलिन झाली. तक्रारकर्त्या पत्रकारानुसार या अभिनेत्यांनी वृत्तपत्रासोबत संपूर्ण पत्रकार समुदायाचा अपमान केला आहे.