याकूबच्या फाशीवर सलमानचं वादग्रस्त ट्वीट

सलमान खानला यश पचवता येत नाही असं म्हणावं लागेल. कारण आपल्या करिअरमध्ये सर्वात चांगला सिनेमा 'बजरंगी भाईजान' लोकांनी डोक्यावर उचलून धरलाय, तेव्हाच सलमान खानने नको त्या विषयात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jul 26, 2015, 10:28 AM IST
याकूबच्या फाशीवर सलमानचं वादग्रस्त ट्वीट title=

मुंबई  : सलमान खानला यश पचवता येत नाही असं म्हणावं लागेल. कारण आपल्या करिअरमध्ये सर्वात चांगला सिनेमा 'बजरंगी भाईजान' लोकांनी डोक्यावर उचलून धरलाय, तेव्हाच सलमान खानने नको त्या विषयात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे.

कारण सलमान खानने याकूबच्या फाशीला विरोध केला आहे. त्याने स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन याकूबच्या फाशीला विरोध दर्शवणारे ट्वीट्स केले आहेत.

 

यामुळे सलमान खान आता चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीकेचा भडीमार होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हा न्यायालयाचा अवमान आहे का यावर देखील चर्चा सुरू आहे.

सलमान खानवर अनेक प्रकरणात आरोप असतांना सलमान खानने अतिशय संवेदनशील विषयात बोलणे टाळले असते, तर ते योग्य राहिले असते असं म्हटलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.