व्हिडिओ : अनुष्काच्या 'फिल्लौरी'चं सुफी गाणं प्रेक्षकांच्या तोंडी!

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या 'फिल्लौरी' या सिनेमाचं पहिलं सुफी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Feb 16, 2017, 10:21 PM IST
व्हिडिओ : अनुष्काच्या 'फिल्लौरी'चं सुफी गाणं प्रेक्षकांच्या तोंडी!

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या 'फिल्लौरी' या सिनेमाचं पहिलं सुफी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'दम दम' या गाण्यात अनुष्का आणि दलजीत दुसांज यांची केमिस्ट्री दिसून येतेय. दलजीत या सिनेमात 'इकतारा' पकडून गाणं गात असलेला दिसतोय. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात या गाण्यात पाहायला मिळतेय. 

हे गाणं रोमी, विवेक आणि हरिहरन यांनी गायलंय तर अन्विता दत्त यांनी हे गाणं लिहिलंय. येत्या २४ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.