‘बाजीराव मस्तानी’चं शूटींग लवकरच होणार सुरु...

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात प्रियांका चोपडाही दिसणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झालंय. या सिनेमाचं शूटींग लवकरच सुरू होतंय.

Updated: Oct 9, 2014, 05:59 PM IST
‘बाजीराव मस्तानी’चं शूटींग लवकरच होणार सुरु... title=

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात प्रियांका चोपडाही दिसणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झालंय. या सिनेमाचं शूटींग लवकरच सुरू होतंय.

ही बातमी खुद्द प्रियांकानंच सोशल मीडियावरून दिलीय... ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाच्या शूटींगला लवकरच सुरुवात होतेय... त्यामुळे आपण खूप आनंदी आणि उत्साही असल्याचं प्रियांकानं सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हटलंय.
 
सोबतच, ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा संजय लीला भन्साली यांचं स्वप्न आहे त्यामुळेच मला थोडीफार धाकधूकही होतेय, असंही प्रियांकानं म्हटलंय.

संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव - मस्तानी' या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांच्याही भूमिका आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.