रणबीरसोबत कतरिना करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन

बॉलिवूडला कैफात बुडविणाऱ्या कतरिना कैफ हिचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे... आपल्या जन्मदिवसाचं सेलिब्रेशन 'कॅट' कशी करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

Updated: Jul 16, 2014, 07:59 AM IST
रणबीरसोबत कतरिना करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन title=

मुंबई : बॉलिवूडला कैफात बुडविणाऱ्या कतरिना कैफ हिचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे... आपल्या जन्मदिवसाचं सेलिब्रेशन 'कॅट' कशी करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

कतरिनाच्या फॅन्सना ती कुणासोबत आपला वाढदिवस साजरा करणारा याचीही उत्सुकता लागलेली असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅट यंदाचा आपला वाढदिवस तिचा कथित प्रियकर रणबीर कपूरसोबत साजरा करणार आहे.  

'कॅट'च्या जन्मदिवसाच्या सेलिब्रेशनवर जोरदार चर्चा सुरू आहेत. पण, रणबीर मात्र हवाई मार्गानं प्रेग पोहचण्याच्या तयारीत आहे. कारण, कतरिना सध्या प्रेगमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं 'बॅँग बँग'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघंही क्रोसिकाला जातील असं समजंतय. 

महत्त्वाचं म्हणजे रणबीरही सध्या युरोपमध्ये आहे. इथं तो त्याच्या 'तमाशा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'तमाशा'मध्ये रणबीरसोबत दीपिका पादूकोन महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. 

कतरिनाच्या वाढदिवसासाठी रणबीर प्रेगला पोहचला तर नक्कीच कतरिनासाठी हे खूप मोठं गिफ्ट असेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.