'बाहुबली'ने टाकले 'धूम ३' ला मागे

राजामौली यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला 'बाहुबली' हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असला तरी त्याने पैसे कमविण्याच्या बाबतीतही चांगलीच बाजी मारली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जगभरात ५०० कोटी रुपये कमविले आहे. 

Updated: Aug 10, 2015, 07:42 PM IST
'बाहुबली'ने टाकले 'धूम ३' ला मागे  title=

मुंबई  : राजामौली यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला 'बाहुबली' हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असला तरी त्याने पैसे कमविण्याच्या बाबतीतही चांगलीच बाजी मारली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जगभरात ५०० कोटी रुपये कमविले आहे. 

बाहुबलीने आमीर खान याच्या 'धूम ३' चा जगभरातील कमाईचा रेकॉर्ड मोडीत काढून जगभरात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

आमीर खानच्या 'धूम-३' ने भारतात २८० कोटींचा बिझनेस केला होता. त्याने जगभरात एकूण ५४२ कोटी रूपयांचा गल्ला जमाविला होता. आता आमीरच्या 'धूम-३' ला बाहुबलीनेच नाही तर यापूर्वी 'बजरंगी भाईजान'नेही मागे टाकले आहे. 'बजरंगी भाईजान'ची जगभरात एकूण कमाई ५६५ कोटी रुपये झाली आहे. 

'बाहुबली'ने गेल्या रविवारी ५४५ कोटींचा पल्ला गाठला आहे. पण सध्या हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे. आमीर खानचा 'पीके' पहिल्या, 'सलमानचा 'बजरंगी भाईजान' दुसऱ्या आणि त्यानंतर बाहुबलीचा क्रमांक लागतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.