अक्षय कुमार मीडियासमोर त्याच्या मुलीचे तोंड का झाकतो?...जाणून घ्या कारण

अभिनेता अक्षय कुमार दुसऱ्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा वेगळा आहे. तो नेहमी त्याची पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवतो. त्यासोबतच तो आपली मुले आरव आणि नितारा यांना नेहमी मीडियापासून दूर ठेवतो. 

Updated: Aug 23, 2016, 04:41 PM IST
अक्षय कुमार मीडियासमोर त्याच्या मुलीचे तोंड का झाकतो?...जाणून घ्या कारण title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार दुसऱ्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा वेगळा आहे. तो नेहमी त्याची पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवतो. त्यासोबतच तो आपली मुले आरव आणि नितारा यांना नेहमी मीडियापासून दूर ठेवतो. 

अक्षय नेहमी आपला मुलगा आरवलाही सोशल मीडियापासून दूर ठेवतो. तसेच जेव्हा कधी अक्षय मुलीसोबत मीडियासमोर येतो तेव्हा नेहमी आपल्या मुलीचा चेहरा कॅमेऱ्यासमोर येऊ देत नाहीत. 

एअरपोर्टवरुनही बाहेर येताना कॅमेरा समोर असल्यास तो आपल्या मुलीचा चेहरा झाकून घेतो जेणेकरुन मुलीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होऊ नये. तसेच कोणत्याही पत्रकाराने निताराचा चेहरा पाहू नये वा तिची चर्चा मीडियात रंगू नये यासाठी अक्षय तिचा चेहरा झाकून घेतो. 

असं म्हटलं जातं की, अक्षय त्याच्या मुलांच्याबाबतीत खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. इतर बॉलीवूड अभिनेत्यांच्या मुलांच्या बातम्या सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. त्याप्रमाणे आपल्या मुलांबाबत कोणत्याही चर्चा बीटाऊनमध्ये होऊ नयेत याची काळजी अक्षय घेत असतो.