Video - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा...

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अमिताभ एका लिफ्टमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचा मूडही एकदम फ्रेश दिसतोय. हा डान्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Updated: Sep 26, 2015, 12:21 PM IST
Video - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा... title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अमिताभ एका लिफ्टमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचा मूडही एकदम फ्रेश दिसतोय. हा डान्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

अमिताभ लिफ्टमध्ये एकटेच काय करत आहेत, असा तुम्हाला विचार पडला असेल. त्यातही ते लिफ्टमध्ये चक्क डान्स करताना तुम्हाला आश्चर्य़ वाटेल. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर केलाय. तसेच काही फोटोही अपलोड केलेत.

हे बिग बी यांचे आगामी टीव्ही शो 'आज की रात जिंदगी'च्या प्रमोशनसाठी आहेत. मात्र, या शोबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे हा शोक कधी प्रसारित होणार याची उत्सुकता आहे.

 

 

Posted by Amitabh Bachchan on Thursday, September 24, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.