पहिल्यांदा वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहिले - अमिताभ

महानायक अमिताभ बच्चनने म्हटलं आहे की, कुली चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर, ज्या लोकांनी आपल्यासाठी प्रार्थना केली मी त्यांचा आभारी आहे, ही घटना माझ्यासाठी पुनर्जन्मसारखी होती.

Updated: Aug 2, 2015, 11:39 PM IST
पहिल्यांदा वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहिले - अमिताभ title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चनने म्हटलं आहे की, कुली चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर, ज्या लोकांनी आपल्यासाठी प्रार्थना केली मी त्यांचा आभारी आहे, ही घटना माझ्यासाठी पुनर्जन्मसारखी होती.

या घटनेला ३३ वर्ष पूर्ण होत आहेत, या अपघातात अमिताभ बच्चन अतिशय गंभीर जखमी होते.

महानायक अमिताभ बच्चन यांचं वय ७२ वर्ष आहे, या घटनेला ३३ वर्ष पूर्ण होत आहे, ही घटना २ ऑगस्ट १९८२ रोजी घडली होती. बच्चन यांनी ट्वीट करून म्हटलंय, "मी पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते."

मनमोहन देसाईंचा सिनेमा कुली चित्रपटात शुटिंग दरम्यान एक फायटिंग सिनमध्ये, पुनीत इस्सर या कलाकाराचा मारलेला एक ठोसा पोटाच्या खालच्या भागाला लागल्याने, रक्ताचा आंतरस्त्राव झाल्याने बच्चन जखमी झाले होते.

अमिताभ यांना लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली, अनेक दिवस कोमा सारखी स्थिती होती, पूर्ववत होण्यासाठी त्यांना काही महिने लागले.

अमिताभ बरे झाल्यानंतर कुली चित्रपटाची शुटिंग सुरू झाली आणि अखेर १९८३ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.