कुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?

सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.

Updated: Jan 28, 2016, 09:43 PM IST
कुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?  title=

मुंबई : सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनीच आपल्याला प्रेम करायला शिकवलं अशी कबुली रेखानं दिली आहे. यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड सोहळ्यामध्ये रेखानं हे वक्तव्य केलं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर रेखानं ही प्रतिक्रिया दिली. यश चोप्रा यांचे चित्रपट बघितल्यामुळेच प्रेम काय असतं ते कळलं,  इतकच नाही तर शायरी लिहायलाही त्यांनीच आपल्याला प्रेरित केलं असंही रेखा म्हणाली.