'बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी अनुपस्थित'

राज्याच्या राजकीय पटलावर ज्यांची चाल सर्वात महत्वाची समजली जाते, त्या शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ देण्याचे संकेत दिले आहेत. भाजपवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ राष्ट्रवादी सभागृहात तटस्थ राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 27, 2014, 09:17 AM IST
'बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी अनुपस्थित' title=

मुंबई : राज्याच्या राजकीय पटलावर ज्यांची चाल सर्वात महत्वाची समजली जाते, त्या शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ देण्याचे संकेत दिले आहेत. भाजपवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ राष्ट्रवादी सभागृहात तटस्थ राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हे संकेत दिले आहेत

भाजपला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही, अशा अवस्थेत भाजप, शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह दिसत नाहीत, पुढील सहा महिने जर ही परिस्थिती कायम राहिली तर राज्याला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेलं, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात स्थिर सरकार रहावं, यासाठी आपण याआधी भाजपला बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र असा पाठिंबा भाजपला नको असेल, तर राष्ट्रवादी सभागृहात अनुपस्थित राहून अल्पमतातलं भाजप सरकार स्थिर कसं राहिलं, यासाठी हातभार लाऊ असं पवारांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.