शाळेत घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सहा जणांना अटक

सातारा जिल्ह्यातील महागाव येथे एका शाळेच्या बांधकाम सुरक्षा रक्षकाच्या घरावर दरोडा टाकून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ६ नराधमांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.

Updated: Sep 19, 2015, 07:17 PM IST
शाळेत घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सहा जणांना अटक title=

सातारा : सातारा जिल्ह्यातील महागाव येथे एका शाळेच्या बांधकाम सुरक्षा रक्षकाच्या घरावर दरोडा टाकून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ६ नराधमांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.

११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास सर्व झोपले असताना महागावात एका शाळेच्या बांधकाम सुरक्षा रक्षकाच्या घरावर दरोडेखोरांना दरोडा टाकला होता. त्यांची मजल इथवरच थांबली नाही तर त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या पत्नीवरही सामूहिक बलात्कार केला. यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला होता.

या आरोपींचा पोलीस कसून तपास करत होते... घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना काही फिंगर प्रिंटसही सापडल्या होत्या. याच फिंगर प्रिंटच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकलेत. 

घटनेनंतर नवव्या दिवशी पोलिसांनी याच परिसरातील एका ढाब्यावरील दोन कर्मचारी आणि जांब व त्रिपुटी या गावांतील चार जणांना अटक केलीय, अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.