अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर: नागपुरात २२ वर्षीय तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय.
आणखी वाचा - भर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
काल रात्री निकिता फुलवाणी ही तरुणी आपल्या मित्रासोबत फुटाळा इथल्या फर्स्ट लव्ह रेस्टॉरंटमध्ये गेली होती. पण हे 'फर्स्ट लव्ह' नावाचं हॉटेल गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. या रेस्टॉरंटच्या छतावर तरुणीचा मित्रांसोबत काही वाद झाला आणि पुढे ही घटना घडल्याचं कळतंय. यात तरुणी ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आणखी वाचा - मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाण्यावरून रणकंदन, एकाची हत्या
दरम्यान, तरुणीनं स्वत: आपल्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलं की, तिच्या मित्रांनी जाळलं याचा शोध पोलीस घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.