ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा

रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. 

Updated: Dec 9, 2015, 01:39 PM IST
ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा title=

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. 

या धडकेनंतर एसटी चालकासह १० जण एसटीत अडकल्याची माहिती पुढे येतेय. या सर्वांना काढण्यासाठी घटनस्थळी मदतकार्य सुरू आहे. चिपळूणहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातानंतर तातडीची मदत पोहचवण्यात आलीय. 

या अपघातामुळे या महामार्गावर ट्राफिकचा खोळंबा उडालाय. घटनास्थळी ट्राफिक पोलीस दाखल झाले असले तर जवळपास ६ किलोमीटर अंतरापर्यंत ट्राफिक जाम झालेलं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.