आता, पायऱ्या चढण्यासाठी वापरता येणार 'वॉकर'...

ज्या व्यक्तींना पायाने व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे वॉकरचा उपयोग करतात अशांसाठी एक गुड न्यूज आहे... आता पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारा वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. बिहारच्या शालिनी कुमार या बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं हे वॉकर तयार केलंय.

Updated: Apr 6, 2015, 05:17 PM IST
आता, पायऱ्या चढण्यासाठी वापरता येणार 'वॉकर'...  title=

नागपूर : ज्या व्यक्तींना पायाने व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे वॉकरचा उपयोग करतात अशांसाठी एक गुड न्यूज आहे... आता पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारा वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. बिहारच्या शालिनी कुमार या बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं हे वॉकर तयार केलंय.

पायानं अपंग किंवा अपघातामध्ये पायाने चालता येत नसल्याने वॉकरचा उपयोग करावा लागतो. मात्र, साधारण वॉकरने पायऱ्या चढता येत नाही किंवा त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, आता त्यावर तोडगा निघाला आहे. बिहार मध्ये राहणाऱ्या शालिनी कुमारी या बारावीत शिकणाऱ्या मुलीने हे पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारे वॉकर तयार केलंय. 

शालिनीच्या आजोबांचा अपघात झाला असता ते वॉकरच्या मदतीने चालायचे मात्र पायऱ्या चढताना त्यांना त्रास होत होता. या वॉकरमध्ये काही बदल करून पायऱ्यांवर चालतील असे बनवावे, अशी कल्पना तिला सुचली. त्यावर अभ्यास करून तिने हे वॉकर निर्माण केलेत. जगात अश्या पद्धतीचे हे पहिले वॉकर असून त्याला नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनही मान्यता दिली आहे. 

'कविरा सोल्युशन'च्या माध्यमातून लवकरच कमी किंमतीत हे वॉकर बाजार उपलब्ध होणार आहेत. १० अपंग लोकांना हे अत्याधुनिक वॉकर वाटण्यात आले आहेत. हे अत्याधुनिक वॉकर तयार करणाऱ्या शालिनीचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय. आपण समाजपयोगी काम केल्याचं समाधान शालिनीच्या चेहऱ्यावर दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.