भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार - अजित पवार

भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार आहे, परदेशातून काळा पैसा आणण्याच आश्वासन देऊन ही अजून एक ही रूपया आला नसल्याची खरमरित टीका आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याच बरोबर बिहारच्या निवडणूक लक्षात घेऊन सव्वा कोटी रूपयांची घोषणा करणार हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका ही अजित पवार यांनी केली.

Updated: Sep 25, 2015, 07:46 PM IST
भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार - अजित पवार  title=

नवी मुंबई : भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार आहे, परदेशातून काळा पैसा आणण्याच आश्वासन देऊन ही अजून एक ही रूपया आला नसल्याची खरमरित टीका आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याच बरोबर बिहारच्या निवडणूक लक्षात घेऊन सव्वा कोटी रूपयांची घोषणा करणार हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका ही अजित पवार यांनी केली.

आज माथाड़ी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. बिहारला सव्वा लाख कोटी रुपये देण्याची घोषणा या सरकारने केली, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास नसल्यानेच ज्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री भेटले त्यानेच आत्महत्या केल्याचे ही अजित पवार हे म्हणाले. पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीसाठी वकिलांची फ़ौज कशी उभी राहते, एवढा पैसा येतो कुठून हे लपून राहिलेले नाही असे म्हणत अजित पवार यांनी सनातन संस्थेवर ही जोरदार टीका केली.

आम्ही कोणत्याही चौकशीपासून पळ काढला नसून आम्ही चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करत असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची सुरु असलेली चौकशी ही केवळ राजकीय द्वेषातून केली जात असून हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र असल्याही टीका ही तटकरे यांनी केली. याचबरोबर पानसरे हत्या प्रकरणात जी काही माहिती समोर येत आहे त्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याच मत ही तटकरे यांनी सनातन वरील बंदी वरील प्रश्नच उत्तर देतांना व्यक्त केले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.