'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले

कल्याणमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळातव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. ‘कुणाच्याही पाया पडू नका... पाया पडण्यासारखे पुढारी आता उरलेले नाहीत’, असं कटू सत्य त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलंय.

Updated: Jul 5, 2014, 11:10 PM IST
'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले title=

कल्याण : कल्याणमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळातव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. ‘कुणाच्याही पाया पडू नका... पाया पडण्यासारखे पुढारी आता उरलेले नाहीत’, असं कटू सत्य त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलंय.

याचवेळी, अजित पवारांनी जागावाटपाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसनं जागावाटपाचे जुनंच सूत्र कायम ठेवलं तर स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा इशारा त्यांनी पुन्हा दिलाय. १४४ नव्हे तर २८८ जागा लढवण्याची तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

ncp‘विधानसभेत बसमधून जायचंय…’

‘लोकसभेत नॅनोत जातील, एवढे खासदार निवडून आले... विधानसभेत बसमधून जायचंय’, असंही अजित पवार म्हणालेत. अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बसमधून म्हणजे अजित पवारांना केवळ 55 आमदारच निवडून आणायचेत का? अशी चर्चा आता रंगलीय.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मात्र अजित पवारांच्या इशाऱ्याला फारसं महत्त्व द्यायचं टाळलंय. विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात होणार आहे. त्यामुळं शरद पवार काही बोलले तरच प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं माणिकरावांनी यवतमाळमध्ये बोलताना स्पष्ट केलं.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.