अमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम

अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं  इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून  घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय. 

Updated: Oct 30, 2014, 12:30 PM IST
अमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम title=

कल्याण : अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं  इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून  घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय. 

ही एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर येत असतानाच सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे कसारा लाईनवरील वाहतूक पूर्णतः  ठप्प झाली होती. सकाळी ७. वाजून २५ मिनिटांनी डाऊन मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 

अजूनही इंजिन हटवण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी २  ते ३ तास लागतील. मध्य मार्गावरही याचा परिणाम झाल्यानं कामाला निघालेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका सहन करावा लागतोय. 

या मार्गावरील वाहतूक विस्कळीत ही होणारी आठवड्यातील तिसरी घटना आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.